Good Bye 2024 – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी, मनमोहन सिंग यांचे निधन; सरत्या वर्षातल्या मोठ्या राजकीय घडामोडी

2024 हे वर्ष अनेक कारणांसाठी वादळी ठरले. तसेच ते राजकीयदृष्ट्याही वादळी ठरले. या वर्षात काय मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या जाणून घेऊयात.

जानेवारी – राम मंदिर आणि प्राण प्रतिष्ठापना
2024 साली करोडो हिंदुंचे स्वप्न पूर्ण झाले. अयोध्येत राम मंदिर साकारले. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामाची प्राण प्रतिष्ठापना झाली.

जानेवारी – हेमंत सोरेन यांना अटक
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली. झारखंडमध्ये सोरेन यांनी आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि तुरुंगात गेले. नंतर सोरने यांची जामिनावर सुटका झाली आणि तुरुंगातून बाहेर आले.

मार्च – अरविंद केजरीवाल यांना अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. केजरीवाल हे मुख्यमंत्री असतानाच त्यांना अटक केली होती. नंतर केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाली आणि तुरुंगातून बाहेर आले.

मे – आंध्र प्रदेशमध्ये व्हाय एस आर काँग्रेसचा पराभव
2024 मध्ये आंध्र प्रदेश राज्याची निवडणूक पार पाडली. यात सत्ताधारी व्हाय एस आर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. तर तेलुगु देसम पक्षाचा विजय झाला. चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची तर जनसेना पक्षाचे पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

जुलै – नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान
जूनमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. तर चारसौ पार म्हणणाऱ्या भाजपची गाडी 240 वर अडकली. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले

जुलै – राहुल गांधी विरोधीपक्षनेते
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर राहुल गांधी हे विरोधीपक्षनेते झाले.

सप्टेंबर – दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी अतिषी
तुरुंगातून बाहेर आल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. तर आतिषी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

ऑक्टोबर – हरयाणात काँग्रेसचा पराभव, भाजप पुन्हा विजयी
हरयाणात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला टफ फाईट दिली. या निवडणुकीत काँग्रेसला 37 तर भाजपला 48 जागा मिळाल्या. भाजपकडून नायाब सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

ऑक्टोबर – जम्मू कश्मीरमध्ये निवडणूक भाजपचा पराभव
2024 मध्ये जम्मू कश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. तब्बल पाच वर्षानंत झालेल्या निवडणुकीत जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्समला सर्वाधिक म्हणजे 42 जागा मिळाल्या. तर भाजपला 29 जागा मिळाल्या. ओमर अब्दुल्लाह यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

नोव्हेंबर – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला 137 जागा मिळाल्या. मिंधे आणि अजित पवार गटाच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले.

डिसेंबर – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे 92 व्या वर्षी 26 डिसेंबर रोजी निधन झाले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, युजीसीचे चेअरमन राहिलेले सिंग यांनी 1991 साली पहिल्यांदा अर्थमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 2004 साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तेव्हा आणि 2009 साली असे सलग दहा वर्ष सिंग हे भारताचे पंतप्रधान होते.