Good Bye 2024 – ‘या’ हिंदी वेबसिरीजने गाजवले यंदाचे वर्ष

2024 हे वेबसिरीजच्या चाहत्यांसाठी एक चांगले वर्ष ठरले. या वर्षात काही गाजलेल्या वेबसिरीजचे पुढचे सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळाले. यात सर्वात बहुचर्चित ठरला तो पंचायतचा तिसरा सिझन. मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनची देखील प्रेक्षकांनी आतूरतेने वाट पाहिली मात्र हा सिझन तेवढा गाजला नाही. या सिझनने प्रेक्षकांची घोर निराशाच केली. तसंच सिझनच्या शेवटच्या पार्टमध्ये चौथा सिझन येणार असल्याचे संकेतही दिले.

पंचायत सिझन – 3 : दोन दमदार सिझन गाजल्यानंतर पंचायतचा तिसरा सिझन देखील चांगलाच गाजला. याचा देखील चौथा सिझन येईल अशी प्रेक्षकांना आशा आहे

हिरामंडी – द डायमंड बाझार : स्वातंत्र्यपूर्व काळातील लाहोरमधील एका कोठा आणि त्या कोठ्यातील महिलांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग यावर ही वेबसिरीज आहे.

इंडियन पोलीस फोर्स: रोहीत शेट्टीच्या या पहिल्या वेबसिरीजमध्ये एका पोलीस अधिकारी कशाप्रकारे गुन्हेगारी, भ्रष्टाचाराशी लढत असतो ते दाखवले आहे.

कोटा फॅक्टरी सिजन 3 : कोटा फॅक्टरी या वेबसिरीजचे पहिले दोन सिझन चांगलेच गाजले. तिसऱ्या सिझननेही प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

 

गुल्लक सिझन 4 – एका मध्यमवर्गीय कुटुंबावर आधारित या वेबसिरीजने धुमाकूळ घातला. यातल्या कॉमेडी सिन्सचे अनेक मिम्सही व्हायरल झाले.

IC184 द कंदहार हायजॅक – कंदहार विमान हायजॅकच्या सत्यघटनेवर ही वेबसिरीज आधारित आहे. या वेबसिरीजमध्ये दिया मिर्झा, विजय वर्मा, यांच्या मुख्य भूमिका आहेत.

किलर सूप – मनोज वाजपेयी आणि कोंकणा शर्मा यांची मुख्य भूमिका असलेली ही वेबसिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.