Gondia: पुराच्या पाण्यातून पायी जात केला विद्युत पुरवठा केला सुरू, वीज कर्मचाऱ्यांची कामगिरी

mahavitaran-worker

>> सूरज बागड, गोंदिया

गोंदिया जिल्यात मागील तीन दिवसांपासून दमदार पाऊसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावल्याने अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुकायच्या काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे 25 गावात 36 तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी पुराचे पाणी कमी होताच दोरीच्या सहाय्याने मार्ग काढत तब्ब्ल तीन तास पाण्यात उभे राहत चार किलोमीटर पायी चालून 25 गावांचा विद्युत पुरवठा सुरू केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस येत असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी- मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला. त्यातच केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला होता यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा 36 तासापासून खंडित झाला होता. मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे या ठिकाणातील येण्या-जाण्याचा मार्ग ही बंद झाले होते. मात्र विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न महावितरण पुढे निर्माण झाला.

यावेळी केशोरी येथील महावितरणच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या साह्याने व दोरीच्या साह्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत पोहचत पाण्यात तीन तास उभे राहून कौशल्य दाखवित वीज पुरवठा सुरळीत केला व मागील 36 तासापासून अंधारात असलेल्या 25 गावातील वीज पुरवठा सुरळीत केला.

तर महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडीओ आणि पाण्यात उभे राहून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा व्हिडिओ सोशलं मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.