
इस्त्रीमध्ये एक कोटीचे सोने लपवून आणणाऱ्या तस्कराला सीमा शुल्क विभागाने अटक केली. शुक्रवारी जेदाह येथून हा प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला अटकाव करण्यात आला. त्याच्या सामानाची झडती घेतली असता बॅगेत दोन इस्त्री आढळून आल्या. त्या इस्त्रीची स्पॅनरद्वारे तपासणी केली असता त्यात काही संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या इस्त्रीची तपासणी केली. त्यात 1 कोटी 2 लाखांचे सोने होते. तो प्रवासी ते सोने कोणाला देणार होता याचा तपास सीमा शुल्क विभाग करत आहे.