
चोरट्या मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना डीआरआयने दणका दिला आहे. डीआरआयने कारवाई करून 21.288 किलोग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 18 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली. दुबई येथून येणारे दोन प्रवासी हे सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. त्यानंतर डीआरआयच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचून दोन प्रवाशांना ताब्यात घेतले.