जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजार या सर्वांचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होतो. गेल्या महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत होते. अचानक या दरांमध्ये मोठी घसरण झाली. मात्र, आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली असून चांदीचे दर काही प्रमाणात घसरले आहेत. तसेच वायदे बाजारातही सोन्यात चांगलीच तेजी दिसत आहे. आता या दरात नेमके कशामुळे बदल होत आहे,याचे कारण जाणून घेऊ या.
सोने आणि चांदीच्या दरावर जागतिक स्थितीचा परिणाम दिसून येत आहे. सोने दरावर डॉलर्सची मजबुती, महागलेलं कच्चं तेल यासारख्या गोष्टी परिणाम करत आहे. तसेच भारतीय शेअर बाजार अजूनही घसरणीतून सावरलेला नाही. तसेच परकीय गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यामुळे सराफा बाजार आणि वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सोन्याच्या दरात गेल्या काही चढ उतार होत होते. आता वायदे म्हणजे कमोडिटी बाजार ते सराफ बाजारात सोन्याच्या दरात तेजी आहे. सोन्याच्या दरावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम होतोय. डॉलर्सचा दर जसा वाढतोय तसा सोन्याचा दर वाढत आहे. सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली तर चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 78270 रुपये आहे. एमसीक्सवर सोन्याचे दर 114 रुपयांनी वाढले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात आगामी काळात तेजी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्रतवली होती. त्याप्रमाणे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, चांदीचे दर घसरले आहेत.
सोन्याचा मंगळवारचा 10 ग्रॅमचा दर 78156 रुपये इतका होता. बुधवारी बाजार सुरु झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर 78241 ते 78381 रुपयांच्या दरम्यान होता. तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीचा दर 90520 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या दरात 36 रुपयांची घसरण झाली. काल चांदीचा दर 90860 रुपयांपर्यंत गेला होता.
मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद आणि नागूपरमध्ये सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली. 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर 80070 रुपये आहे. अहमदाबाद,पाटणा येथे देखील सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 80120 रुपयांवर आहे. दिल्ली, चंदीगढ, जयपूर, लखनौमध्ये सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याच्या दर 80220 रुपये इतका आहे.