सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ

सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी वाढ झाली. 24 पॅरेटचे सोने 299 रुपयांनी वाढून 76,635 रुपये तोळा झाले आहे, तर चांदीच्या भावातसुद्धा 394 रुपयांनी वाढून प्रति किलो 88 हजार 40 रुपयांवर पोहोचली आहे.

ऑक्टोबर महिन्यात सोन्याने 79,681 रुपये तोळा तर चांदीने 99 हजार 151 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता, परंतु काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा सोने-चांदीचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत 22 पॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये झाली आहे, तर 24 पॅरेट सोने 78 हजार रुपये झाली आहे.