आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. सराफा बाजारात 2 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या भावात 873 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने प्रति तोळा 75,867 रुपयांवर आले. सोन्याबरोबर चांदीच्या भावातही घसरण झाली. चांदी 1332 रुपयांनी घसरून प्रति किलो 88 हजार 051 रुपयांपर्यंत खाली आली. ऑक्टोबर महिन्यात चांदीचा दर 99 हजार 151 रुपयांपर्यंत पोहोचला होता, तर सोन्याचा भाव 79,681 रुपये तोळा झाला होता.