सोन्याच्या दरात एका दिवसात 1400 रुपयांची वाढ; लवकरच 1 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता

जागतिक अस्वस्थता आणि तणावाच्या काळामुळे शेअर बाजारात दबावाखाली आहे. मात्र, त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे अनेक गुतंवणूकदारांचा कल आहे. त्यामुळे सध्या सोन्याला तेजी आली आहे. जगभरात सोने दरात जोरदार तेजी आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ ट्रेडचं धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततता, आरबीआय आणि रिटेल खरेदीदारांकडून सोने खरेदी वाढल्यानं दर सातत्यानं वाढत आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 89500 रुपये आहे. मंगळवारी दिवसभरात सोन्याचे दर तब्बल 1400 रुपयांनी वधारले आहेत.

सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 88100 रुपये होता. मंगळवारी वायदे बाजारात हा दर 89500 रुपयांवर गेला होता. मंगळवारी सोन्याचा दरात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरातील तेजी पाहता लवकरच सोने एक लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लग्नसराई सुरु असल्यानं सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी काळात अमेरिकनं टॅरिफ धोरणामुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. त्यांनी आयात शुल्क वाढवण्याचे निर्णय घेतल्यानं सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत. गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुतंवणूक होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असून सोन्याने बाजारात उच्चांकी स्थान मिळवले आहे. गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासामुळे आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे सोने अधिकाधिक महाग होत आहे. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.