
मुंबई, दि. 16 (वृत्तसंस्था)- सोन्याच्या दराने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 98 हजार 100 रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या दरात सार्वकालीन 1 हजार 650 रुपयांची वाढ झाली. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याचे अर्थतज्ञांनी म्हटले आहे. मंगळवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅममागे 96,450 रुपयांवर पोहोचले. यापूर्वी 11 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात तब्बल 6 हजार 250 रुपयांची वाढ नोंदवली गेली होती.