सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी; सोन्या-चांदीच्या दरात घसरण

जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील चढ-उतारांचा सोन्या-चांदीच्या दरावरही परिणाम होतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, बुधवारी सोन्या- चांदीच्या दरात घसरण झाल्याने आता सुर्वणखरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सराफा बाजाराप्रमाणेच वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर घसरले आहेत.

सोन्याच्या फेब्रुवारीच्या वायद्यात घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 81 रुपयांची घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 77450 रुपये इतका आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 77402 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. एमसीएक्सवर चांदीच्या दरात 162 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा दर 90711 रुपये आहे. चांदीचे हे दर मार्चच्या वायद्याचे आहेत. एमसीक्सवर एक किलो चांदीचा दर 90665 ते 90889 रुपयांदरम्यान आहे.

सराफा बाजारातही मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, आणि नागपूरमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 78820 रुपये इतका आहे. नवी दिल्ली, चंदीगड, लखनौ आणि जयपूर या शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 78970 रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली. फेब्रुवारीच्या वायद्याच्या सोने दरात 5.26 डॉलरची घसरण झाली. तिथ 2260.14 डॉलर प्रति औन्स सोनं मिळत आहे. चांदीच्या मार्चच्या वायदेबाजारात देखील घसरण पाहायला मिळाली.