![Gold](https://www.saamana.com/wp-content/uploads/2022/10/Gold-696x447.jpg)
हिंदुस्थानात सोन्याचा भाव 87 हजारांवर गेला आहे. सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले आहेत. सोन्याची क्रेझ केवळ हिंदुस्थानात नाही तर संपूर्ण जगात वाढली आहे. 2022 पासून सोने लागोपाठ एक हजार टन खरेदी केले जात आहे. याचाच अर्थ 2025 मध्येसुद्धा जगभरातील सेंट्रल बँका लागोपाठ चौथ्या वर्षी एक हजार टन सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये जगभरातील सेंट्रल बँकांनी 1,044.6 टन सोने खरेदी केले होते. यामध्ये 333 टन सोने केवळ ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत खरेदी केले होते. 2010 ते 2021 या वार्षिक सरासरी 473 टनच्या तुलनेत सेंट्रल बँकांची खरेदी गेल्या तीन वर्षांपासून खूपच जास्त राहिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत 27 टक्के वाढ झाली आहे.
हिंदुस्थानची केंद्रीय बँक आरबीआयने एकूण 73 टन सोन्याची खरेदी करत 2024 मध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. हिंदुस्थानचे सोने 876 टनांपर्यंत पोहोचले आहे. देशाच्या एकूण विदेशी मुद्रा भंडार म्हणजेच फॉरेक्स रिझर्व्हच्या हे 11 टक्के आहे. आरबीआयने 2021 मध्ये 77 टन, तर 2009 मध्ये 200 टन सोन्याची खरेदी केलीय. देश 2023 मध्ये सहाव्या स्थानावर होता.
वर्ष सोने खरेदी
- 2019 605.41 टन
- 2020 254.95 टन
- 2021 450.11 टन
- 2022 1080.01 टन
- 2023 1050.81 टन
- 2024 1044.63 टन
देश सोने खरेदी
- पोलंड 89.50 टन
- तुकाa 74.80 टन
- हिंदुस्थान 72.60 टन
- अजरबैजान 44.60 टन
- चीन 44.20 टन
- चेक रिपब्लिक 20.50 टन
- इराक 20.10 टन
- हंगरी 15.50 टन
- उझबेकिस्तान 11.20 टन
सर्वाधिक सोने खरेदीत पोलंड अव्वल
वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या माहितीनुसार, 2024 मध्ये सर्वात जास्त सोने हे पोलंड सेंट्रल बँकेने खरेदी केलेय. पोलंडच्या केंद्रीय बँकेने आपल्या सोन्याच्या रिझर्व्हमध्ये 90 टन सोने वाढवले आहे. पोलंडचे सोने आता 448 टनांवर पोहोचले आहे. पोलंडची केंद्रीय बँक 130.03 टन सोने खरेदीसोबत 2024 मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली. दुसऱ्या नंबरवर असलेल्या तुकाaच्या केंद्रीय बँकेने 74.80 टन सोन्याची वाढ केलीय.