तीन महिन्यांत सोने 15043 रुपयांनी महागले

सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. तीन महिन्यांत सोने 15043 रुपयांनी महागले आहे. या वर्षी, 1 जानेवारीपासून आतापर्यंत, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 15,043 रुपयांनी म्हणजेच 20टक्क्यांनी वाढून 76,162 रुपयांवरून 91,205 रुपयांवर पोहोचली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील प्रति किलो 86,017 रुपयांवरून 11,283 रुपयांनी म्हणजेच 13 टक्क्यांनी वाढून 97,300 रुपयांवर पोहोचली आहे.

2024 मध्ये सोने 12,810 रुपयांनी महाग झाले होते. 3 एप्रिल रोजी तर सोन्याने उच्च पातळी गाठली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 209 रुपयांची वाढ होऊन तो प्रति तोळा 91,205 रुपयांवर पोचला आहे. 1 एप्रिल रोजी सोन्याने 91,115 रुपयांचा उच्चांक गाठला होता.