
सोने आणि चांदीच्या वाढत्या दराला सोमवारी अखेर ब्रेक लागला. सोने 1039 रुपयांनी घसरून प्रति तोळा 84 हजार 959 रुपयांवर पोहोचले, तर चांदीच्या किमतीत 2 हजार 930 रुपयांची घसरण झाली असून चांदी प्रति किलो 95 हजार रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत आता 79 हजार 400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार 620 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोने दिवाळीपर्यंत आणखी महाग होणार आहे.