सोने ‘लख’पती, 97 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला

घसरता रुपया आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोन्याने प्रथमच 97 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. मुंबईत सोन्याचा भाव तोळ्याला 96 हजार 587 रुपये इतका होता. जीएसटी धरता 10 ग्रॅम सोन्याकरिता एक लाख 116 रुपये मोजावे लागत होते. ऐन लग्नसराईच्या दिवसांतच सोन्याने उच्चांक गाठला आहे.