मुंबईत सोने 87 हजार रुपये तोळा

सोन्याच्या दराने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत ऐतिहासिक उसळी घेतली आहे. सोने 87 हजार पार गेले. मुंबईत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅममागे 87 हजार 550 रुपयांवर गेला. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध तसेच बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत मोठ्य़ा प्रमाणावर गुंतवणूक केल्याने सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. मुंबईसह दिल्ली, चेन्नई आणि कोलकात्यात सोन्याचे दर चढे दिसले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा दर 84252 रुपये प्रतिग्रॅम इतका दिसला.