
सोन्याचे भाव आता गगनाला भिडत असून सोने लवकरच तोळ्याला एक लाखांचा भाव घेईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम, अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातही सोन्याने पहिल्यांदाच तोळ्याचा 95 हजार 200 रुपयांचा टप्पा गाठला आहे. दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल तीन हजारांनी वाढ झाली आहे. काल सोन्याच्या दरात 2300 रुपयांची वाढ झाली, तर आज पुन्हा सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत एप्रिलमध्ये सोन्याला बाजारात 6,800 रुपयांची वाढ मिळाली असून दिल्लीत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 90 हजार 200 रुपयांवर पोहोचला होता. तर आज सोन्याचा भाव 96450 रुपयांवर गेल्याने टेन्शन वाढणार आहे.