
खास दिवसासाठी आणि सणासाठी तयार व्हायचं असेल तेव्हा, काय करावं कोणतं फेशियल करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी गोल्ड फेशियल करा हे तुम्हाला जाणकार सांगतील. पण अनेकदा तर, घाई गडबडीमध्ये बाहेर जाऊन फेशियल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी आपण घरी राहूनही गोल्ड फेशियलचा आनंद घेऊ शकतो. मुख्य म्हणजे गोल्ड फेशियल खूप महाग असते. ते केल्यावर चेहऱ्यावर मस्त चमकतो आणि त्यावर एक वेगळीच चकाकी येते. म्हणूनच खास समारंभासाठी गोल्डन फेशियल हा एक उत्तम पर्याय आहे.
गोल्ड फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे क्लिंजिंग. क्लिंजिंगमुळे त्वचेवर साचलेली घाण साफ होते. क्लिजिंगसाठी 1चमचा दुधात कापूस भिजवा आणि चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि हलकेच संपूर्ण चेहऱ्यावर दूध लावा. यानंतर, कापसाने चेहरा स्वच्छ करा.
फेशियलसाठी चेहरा स्क्रब करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने त्वचा आतून स्वच्छ होते आणि मृत त्वचेच्या पेशी देखील निघून जातात. हे करण्यासाठी, 1चमचा लिंबाचा रस, 1/4 साखर आणि 1 चमचा मध मिसळा आणि मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाने चेहऱ्यावर गोलाकार हालचालीत मालिश करा. 5मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.
गोल्ड फेशियल करण्यासाठी, तुमच्या चेहऱ्याला मसाज करायला विसरू नका. मालिश केल्याने त्वचा हायड्रेट होते आणि रक्ताभिसरण देखील सुधारते. चेहऱ्याला मसाज करण्यासाठी 1चमचा एलोवेरा जेल घ्या आणि 5 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा.
गोल्ड फेशियल करण्यासाठी चेहऱ्यावर फेसपॅक लावणे खूप महत्त्वाचे आहे. फेसपॅक लावल्याने त्वचेच्या आतील पेशी दुरुस्त होतातच पण चेहऱ्यावरील चमकही वाढते. फेस पॅक लावण्यासाठी, 1 चमचा बेसन, 1 चिमूटभर हळद, 1 चमचा मध आणि आवश्यकतेनुसार दूध मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
गोल्ड फेशियल करण्याचे फायदे
गोल्ड फेशियल केल्याने त्वचेचा रंग सुधारतो.
गोल्ड फेशियल केल्यानंतर त्वचेवरील डाग खूप कमी होतात आणि चेहरा चमकदार होतो.
गोल्ड फेशियल केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
गोल्ड फेशियल केल्याने, पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते. तसेच काळवंडलेली त्वचा देखील कमी होण्यास मदत होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)