सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली. मंगळवारी सोन्याच्या दरात 87 रुपयांची किरकोळ घसरण झाली. या घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 68 हजार 713 रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरात 576 रुपयांनी घसरण झाल्यानंतर चांदी प्रति किलो 81 हजार 616 रुपयांवर पोहोचली आहे.