अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याज कपात करताच गुरुवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1 हजार 29 रुपयांची घसरण होऊन सोने 75,629 रुपये तोळ्यावर पोहोचले तर चांदीच्या दरात 2214 रुपयांची घसरण होऊन चांदी प्रति किलो 86,846 रुपयांपर्यंत खाली आली. 23 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव तब्बल 99 हजार 151 रुपयांवर होता, तर 30 ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर 79 हजार 681 रुपये प्रति तोळा झाला होता.