उत्तर गोव्यातील एका गावात एका नराधमाने चार वर्षीय युरोपियन चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिमुरडीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 29 वर्षीय बिहारी तरुणाला अटक केली आहे. मोहम्मद फैय्याज असे त्या तरुणाचे नाव आहे.
पीडित मुलगी युरोपियन असून तिचं कुटुंब 2016 पासून सतत हिंदुस्थानात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी ते कायमचे गोव्यात स्थायिक झाले. त्यांच्या शेजारीच एक बिहारी कुटुंब राहते. त्यामुळे सदर मुलगी त्यांच्या घरी बऱ्याचदा जायची. त्याचाच फायदा घेत फैय्याजने पीडित मुलीवर बलात्कार केला.
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी फैय्याज विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.