
जगभरातील 40 टक्के जनतेला आपल्या भाषेतून किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेतून शिक्षण मिळत नाही किंवा उपलब्ध होत नाही, अशी धक्कादायक माहिती युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग टीमच्या अहवालातून उघड झाले आहे. अल्प किंवा मध्यम उत्पन्न गट असलेल्या देशांमध्ये आपल्या भाषेत शिक्षण न मिळणाऱ्यांचा आकडा 90 टक्के असून यात तब्बल 25 कोटी विद्यार्थी भरडले जात असल्याचे समोर आले आहे.
भाषेत असलेली विविधता आपल्या भाषेत शिक्षण उपलब्ध न होण्याचे मोठे कारण आहे. विविध भाषा बोलणारे विद्यार्थी एकाच वर्गात शिकत आहेत. सध्याच्या घडीला 3.1 कोटी विस्थापित झालेला तरुण वर्ग भाषेतील अडचणींमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापासून वंचित राहत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.