माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची सरकारकडे मागणी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 92 वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारकडे सिंह यांच्या स्मारकासाठी जागा मागितली आहे.

मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार होतील. त्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यालयात सिंह यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. गुरुवारी सिंह यांचे निधन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी यांनी सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.