रशियात मुले जन्माला घाला अन् नऊ लाख मिळवा, जन्मदर वाढविण्यासाठी वाट्टेल ते!

रशियातील जन्मदर वाढविण्यासाठी रशिया सरकारने महिलांसाठी एक खास ऑफर आणली आहे. 24 वर्षांखालील महिलांनी मुलाला जन्म दिल्यास सरकारकडून या महिलेला 1.02 लाख रुबल म्हणजेच जवळपास 9.40 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. रशियात जन्मदर वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. रशियात सध्या जन्मदर प्रति महिला 1.5 मुले आहे. परंतु लोकसंख्या वाढविण्यासाठी जन्मदर 2.1 असायला हवा, असे सरकारचे म्हणणे आहे.

रशियात 2024 मध्ये पहिल्या सहामाहीत जन्मदर गेल्या 25 वर्षांतील सर्वात खालचा जन्मदर होता. जून 2024 मध्ये जन्मदर एक लाखापर्यंत खाली घसरल्याने रशियन सरकारची चिंता वाढली. रशियाचे आरोग्यमंत्री डॉ. येवगेनी शेस्तोपालोव यांनी तरुणांना आवाहन केले आहे की, देशाचा जन्मदर वाढविण्यासाठी पुढे येऊन सहकार्य करावे.