तेलंगणा सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्राकडे केली आहे. सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची विनंती केंद्राकडे केली. याशिवाय देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. सिंग यांचा पुतळा बसवण्याच्या प्रस्तावालाही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तेलंगणा विधानसभेत शोक प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, ”माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. टीका होऊनही माजी पंतप्रधानांनी मौन बाळगले आणि कधीही संयम सोडला नाही. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यावर भर दिला. त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला गेला पाहिजे.”
मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, आपली आर्थिक स्थिती चांगली नसताना त्यांनी देशाची धुरा सांभाळली. माहितीचा अधिकार आणि रोजगार हमी सारखे कायदे त्यांचा चिरस्थायी वारसा दर्शवतात. यावेळी मुख्य विरोधी पक्ष बीआरएसने रेड्डी यांच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला.
Hyderabad | Telangana CM Revanth Reddy says, ” The demise of former Prime Minister Manmohan Singh is an irreparable loss for the country. Despite criticisms, the former PM maintained silence and never lost his patience. Dr Manmohan Singh focused on strengthening the country… pic.twitter.com/uSOe1RZlvU
— ANI (@ANI) December 30, 2024