बेटी बचाओ बेटी पढाओसाठी दिलेल्या भाषणात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार, गुजरातमधली धक्कादायक घटना

एका अल्पवयीन मुलीने बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर जोरदार भाषण दिलं आणि त्यात तिला पहिला क्रमांक मिळाला होता. याच मुलीवर तिच्या शिक्षकाने अमानुष बलात्कार केला आहे. गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरण आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये एका दहावीच्या विद्यार्थिनीने प्रजासत्ताक दिनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत भाषण दिलं होते. या स्पर्धेत या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर तिच्या शिक्षकाने आपल्या वाढदिवसानिमित्त तिला हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये नराधम शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास दहावीच्या परीक्षेत नापास करेन अशी धमकीही दिली. या मुलीने मोठी हिंम्मत दाखवत आपल्या पालकांना ही बाब सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोअंतर्गत कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.