![marrige](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/marrige-696x447.jpg)
सध्या व्हॅलेंटाईन डे ची सगळीकडे चर्चा आहे. परंतु, व्हॅलेंटाईन डे ला अवघे दोन ते तीन दिवस उरले असताना एका लग्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. अडीच फुटांचा नवरदेव आणि तीन फुटांची नवरी असलेल्या या लग्नावर सोशल मीडियावर भरभरून कमेंट केल्या जात आहेत. नवरदेवाचे नाव जसमेर सिंग उर्फ पोला मलिक आहे. त्याची ओळख कॅनडामध्ये राहणाऱ्या सुप्रीत कौर हिच्याशी फेसबुकवर झाली. फेसबुकवरील मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही. सुप्रीत कौर ही मूळची जालंधरची रहिवासी आहे. परंतु, ती आता कॅनडात राहते. सुरुवातीला फेसबुकवर चॅटिंग झाली. परंतु, दोघेही उंचीने कमी असल्याने त्यांच्यात आणखी जिव्हाळा निर्माण झाले. त्यांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्यासाठी सुप्रीतने थेट हिंदुस्थान गाठले. या दोघांनीही थाटामाटात लग्न केले. शानदार रिसेप्शन ठेवले. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळींना आवर्जून बोलावले. सध्या या लग्नाची चर्चा सुरू आहे.
अनोखा प्रेमविवाह
सुप्रीत आणि जसमेर यांचा प्रेमविवाह आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रेम हे आंधळे असते, असे म्हटले जाते. ते काहीही पाहत नाही. दोघांच्या उंचीमुळे लग्न होईल की नाही, असे बोलले जात होते. परंतु, या दोघांनी एकमेकांना पसंत करत मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाच्या फोटोवर नेटिजन्सनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
स्टेजवर डान्स
सुप्रीत आणि जसमेर हे दोघेही लग्नानंतर प्रचंड आनंदी आहेत. या दोघांनीही स्टेजवरच भन्नाट डान्स केला. त्यांचा हा डान्स पाहून उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या डान्सचे कौतुक केले. या दोघांचा डान्स सुद्धा व्हायरल झाला आहे. प्रेमामुळे सर्व काही शक्य होते. खरे प्रेम हे उंची किंवा रंग रूप पाहून होत नाही तर ते मनातून होत असते, अशा कमेंट अनेकांकडून केल्या जात आहेत.