
हिंदुस्थानी क्रिकेटविश्वातील 14 वर्षांखालील मुलांची सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठची आंतरशालेय स्पर्धा असलेली गाइल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आजपासून मुंबईच्या अनेक मैदानांवर एकाच वेळी सुरू आहे. या स्पर्धेत एकंदर 179 शालेय संघ सहभागी झाले असून बाद पद्धतीने स्पर्धा खेळविली जाणार आहे. 12 आणि 13 डिसेंबरला स्पर्धेच्या साखळी लढतींना प्रारंभ होत असून तब्बल 186 लढती खेळल्या जातील, अशी माहिती मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या क्रिकेट विभागाचे सरचिटणीस नदीम मेमन यांनी दिली. या स्पर्धेच्या लढती आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, दडकर मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील खेळपट्टय़ांवर खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने वांद्रे -कुर्ला संकुलातील ऍकॅडमीच्या मैदानावर खेळविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.