
मुंबईत खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तर प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घाटकोपर- रमाबाई कॉलनी फ्लायओव्हरची दुसरी लेन तयार होऊन एक आठवडा झालाय. आता लोकांसाठी तो कधी खुला करणार? असा सवाल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
घाटकोपर- रमाबाई कॉलनी फ्लायओव्हरची दुसरी लेन तयार होऊन एक आठवडा झालाय.
लोकांसाठी तो कधी खुला करणार?
कशासाठी थांबला आहात?सीएम साहेब, कृपया आदेश द्या, व्हीआयपींसाठी न थांबता; तो मार्ग लोकांसाठी खुला करा! pic.twitter.com/xzizRwC7qJ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 5, 2025
याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, घाटकोपर- रमाबाई कॉलनी फ्लायओव्हरची दुसरी लेन तयार होऊन एक आठवडा झालाय. लोकांसाठी तो कधी खुला करणार? कशासाठी थांबला आहात? सीएम साहेब, कृपया आदेश द्या, व्हीआयपींसाठी न थांबता; तो मार्ग लोकांसाठी खुला करा! असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये केले आहे.