बीड जिह्यात विशेषतः परळीमध्ये गुंडांचे राज्य निर्माण झाले आहे. गुंडगिरीने सामान्य जनता दहशतीखाली वावरत आहे. व्यापारी शहर आणि जिल्हा सोडून जात आहेत. ज्या व्यक्तीला संकटकाळात आम्ही साथ दिली, त्या व्यक्तीने आमचा पक्षच पह्डला. अशा व्यक्तीला सत्तेतून हद्दपार करा आणि परळीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज शनिवारी बीड जिह्यातील परळीत शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेला व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, अडचणीच्या काळात ज्यांना साथ दिली, मदतीचा आधार दिला, संकटकाळात धीर दिला, त्यांनी माझा पक्ष पह्डण्यासाठी पुढाकार घेतला, असे म्हणत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. पुढे ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी स्व. पंडितअण्णा मुंडे हे आपल्या मुलाला धनंजयला घेऊन माझ्याकडे आले. ‘आम्हाला तुमची मदत हवी आहे’ असे म्हणत आमच्याकडून मदतीची अपेक्षा केली. तो शब्द पूर्ण करत धनंजय मुंडेंना विधान परिषदेवर मोठी संधी दिली. एवढेच काय, विरोधी पक्षनेते पदही दिले. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. मंत्रिमंडळातही त्यांना संधी दिली. मात्र काही वर्षांतच त्यांनी आमचा पक्ष पह्डला. मोठा धोका दिला. अशा गद्दारांना सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी केले.