डीएचएल 8 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार

जर्मन कंपनी डीएचएल आपल्या 8 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. पुढील दोन वर्षांत म्हणजेच 2027 पर्यंत 1 अब्ज डॉलरहून अधिक बचत करण्यासाठी डीएचएलने 8 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मन लॉजिस्टिक्स कंपनीने वार्षिक ऑपरेटिंग नफा 7.2 टक्क्यांनी कमी झाल्याचे जाहीर केले आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपनी कर्मचारी कपात करत आहे. ही कपात डीएचएलच्या पोस्ट आणि पार्सल जर्मनी विभागात केली जाणार आहे. ही कर्मचारी कपात एकूण कर्मचाऱ्यांच्या एक टक्क्यापेक्षा जास्त असेल. डीएचएलचे जगभरातील 220 हून अधित देशात जवळपास 6 लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.