मेट्रो-3 मार्गिकेत दोन हजारांहून झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण

एमएमआरसीने मेट्रो-3 मार्गिकेत लावण्यात आलेल्या वा पुनर्रेपित केलेल्या झाडांच्या जिओ टॅगिंगचे काम हाती घेतले असून आतापर्यंत दोन हजारांहून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. त्यावर क्यूआर कोड लावण्यात आला असून उर्वरित झाडांवर क्यूआर कोड लावण्याचे काम सुरू आहे. झाडावरील क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना झाडांची उंची, आकार, प्रजाती, नाव आणि इतर संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एमएमआरसीने किती आणि कोणती झाडे लावली आहेत याची माहिती उपलब्ध होणार असून झाडांच्या पुनर्रेपण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.