जनरल उपेंद्र द्विवेदी लष्करप्रमुख

हिंदुस्थानचे तिसावे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पदभार स्वीकारला. लष्कराचे उपप्रमुख म्हणून ते सेवा बजावत होते. 1 जूनच्या रात्री सरकारकडून द्विवेदी यांच्या नावाची नवे लष्करप्रमुख म्हणून घोषणा करण्यात आली होती. त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे.