पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीशी राजपत्रित अधिकारी महासंघ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर आरोप केले आहेत. पण जिल्हाधिकारी दिवसे यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महामंघाने धाव घेतली आहे. त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असून या सर्व प्रकरणाची उत्तस्तरीय चौकशीची मागणी महासमंघाने केली आहे.

पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. हे आरोप तथ्यहीन आहेत, दिशाभूल करणारे व त्यांची प्रशासकीय प्रतिमा मलिन करणारे आहेत. वास्तविक डॉ. दिवसे हे एक कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख कार्य करणारे तसेच त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या आपुलकीने सोडविणारे एक वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय शिस्त व शासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी तसेच चुकीचा पायंडा पडू नये, यासाठी या प्रकरणाची गांभीर्यपूर्वक व प्राधान्याने उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी महासंघाच्या निवेदनात केली आहे. महासंघातर्फे मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही हे निवेदन देण्यात आले आहे.