गाझामध्ये तीन दिवस शांतता, पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी युद्ध थांबवणार

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. पोलिओचा रुग्ण आढळल्याने लसीकरण करण्यासाठी हे युद्ध थांबवले जाणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलिओचा रुग्ण आढळला आहे. यामुळे आता पॅलेस्टिनी भागात लसीकरण मोहीम येत्या 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 ते दुपारी 3 या वेळेत युद्धविराम असणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले. लसीकरण मोहीम सर्वात आधी मध्य गाझामध्ये सुरू होईल, जिथे तीन दिवसांचा युद्धविराम असेल. दक्षिण गाझाकडे लसीकरण मोहीम राबवली जाईल. जिथे आणखी तीन दिवस युद्धविराम असेल. त्यानंतर उत्तर गाझामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे डब्ल्यूएचओच्या अधिकाऱयाने सांगितले. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. युद्धात हजारो बळी गेले आहेत.