कोकण म्हटले की गणेशोत्सव आणि शिमगा हे समीकरण आहे. तसेच कोकणात अनेक गावात एक परंपरा अनेक वर्षांपासून जपली जाते ती म्हणजे गावपळण… आचरे गावात नुकतीच गावपळण रंगली. यासाठी गावकऱ्यांसह चाकरमान्यांचीही उपस्थिती होती. त्यांनी या गावपळण पंरपरेचा अनुभव घेतला.
आकाशाचे छत आणि जमिनीचे अंथरूण आणि वाडीतील ग्रामस्थांनी कल्पकतेने सजवितलेल्या राहूट्या. असे वातावरण गावपळीच्यावेळी दिसले. गावपळण म्हणजे राहते गाव सोडून जीवनावश्यक वस्तू जनावरे सोबत घेत गावच्या बाहेर जात तेथे रात्रभर मुक्काम करणे…यालाच गावपळण असे म्हणतात. गावाबाहेर मोकळ्या वातावरणात केवळ मौजमजा करणे, चमचमत्या चांदण्यात भजन खेळ,नाच गाणे असे अनेक कार्यक्रमांची रेचलेच असते. त्यानंतप शुभ्र आकाशाखाली गावकरी निद्रिस्त होतात.
हे सगळे अनुभवण्यासाठी चाकरमान्यांसोबत येणाऱ्या मित्र-मैत्रिणी पर्यटकांची होणारी गर्दी यामुळे आचरे गावची गावपळण परंपरा पर्यटकांसाठी इव्हेंट मॅनेजमेंटच ठरत आहे. आचरा गावपळण रविवारी दुपारपासून सुरू झाली. एक रात्र सरली. आचरे ग्रामस्थांच्या अंगात गावपळण अक्षरशः भिनली आहे. आता कोणाचा त्रास नाय वाटात तसा रव्हाचा आणि व्हाया तसा वावराचा अशा अविर्भावात आचरे वासिय गावपळमध्ये वावरत आहेत.
रविवारची गावपळणीची रात्र सर्वांना आनंदाची ठरली. करमणुकीसाठी भजन पावला नृत्याबरोबरच गोमू नृत्यानेही रंगत आणली होती. केवळ युवाईच या आनंदात सहभागी झाली नाही तर महिलाही त्यात वयोवृद्ध महिलांनीही फेर धरल्याचे दिसत होते. हे सगळे अनुभवण्यासाठी या गावाचे गावपळणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तीं केवळ गावपळण म्हणजे काय आहे हे अनुभवण्यात आलो होते. याबाबत या भागात गावपळ टेलीफिल्म बनविण्यासाठी आलेले चित्रपट क्षेत्राशी संबंधित नंदू आचरेकर सुमित आचरेकर सांगतात.गावपळण हि प्रथा,त्याची संकल्पना आमच्यासाठी अत्यंत कुतूहालास्पद वाटत आहे. तीन-चार दिवसांकरता अख्ख गाव रिकामे होते. आणि ते सुद्धा घरातील गुरेढोरे कोंबड्या कुत्र्यांसहन गाव रिकोमे करण्यात येते. आचरा काझीवाडी येथील राजू मुजावर यांनी सांगितले की आमचा आचरा गाव सर्व धर्मसमभावाचे प्रतिक आहे. त्यामुळे या प्रथेत आम्हीही सहभागी होतो.
पाहुणचाराची प्रथा गावपळणीतही दिसून आली. कोकणी माणूस येणार्या पाहूण्यांचे आगत स्वागत करण्यात नावाजला आहे. गावपळणीतही ते दिसून आले आहे. गावपळणीत वेशीबाहेर राहिलेल्या ग्रामस्थांचे राहणीमान अनुभवण्यासाठी येणारया लोकांना ,प्रसारमाध्यम प्रतिनिधिंना येथिल ग्रामस्थ राहुट्यात राहत असले तरी आग्रहाने चहापाण्यापासून अगदी जेवणा पर्यंत करत असलेला आग्रह आणि प्रेमाने होणारी सरबराई गावपळणीतील वेगळेपण दाखवत आहे.