देशाच्या विकासाचा पाया काँग्रेसने रचला, गौतम अदानी यांनी केली स्तुती

अदानी ग्रृपचे चेयरमन गौतम अडाणी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक धोरणांची स्तुती केली आहे. अचानक गौतम अदानी यांनी केलेल्या काँग्रेसच्या स्तुतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पीव्ही नरसिंहा राव व मनमोहन सिंह अर्थ मंत्री असताना देशाच्या आर्थिर विकासाचा पाया रचला गेला, असे अदानी म्हणाले.

”1991 ते 2014 चा काळ हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया तयार करणे व योग्य रनवे निर्माण करण्याचा होता तर 2014 ते 2024 हा काळ देशाच्या विकासाच्या टेकऑफचा होता. माजी पंतप्रधान पीवी नरसिंहा राव व त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी आणलेली आर्थिक सुधारणा ही देशाच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. 1991 मध्ये काँग्रेसच्या सरकारने जागतिकीकरणाच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांची मालिका सुरू केली. 1991 हे देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले”, असे गौतम अदानी म्हणाले.