तर बायको पळून जाईल, आठवड्याला 70 तास काम करण्याच्या मुद्द्यावर अदानी यांचे विधान

आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे असे विधान इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनी केले होते. आता अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी एक विधान केले आहे. Work Life Balance करताना काही लोक बायकोसोबत आठ तास घालवतात. बायकोसोबत आठ तास घालवले तर ती पळून जाईल असे अदानी म्हणाले.

आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलताना अदानी म्हणाले की, आयुष्यात जे तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी आयुष्य जगत आहात. बाकी तुमचे Work Life Balance माझ्यावर लादता येणार नाही आणि माझे Work Life Balance तुमच्यावर लादता येणार नाही. तर तुम्ही हे पाहिलं पाहिजे की दिवसातले चार तास तुम्ही कुटुंबासोबत घालवत आहात आणि तुम्हाला आनंद मिळत आहे. काही लोक बायकोसोबत आठ तास घालवतात. जर तुम्ही बायकोसबत आठ तास घालवले तर तुमची बायको पळून जाईल.


तसेच काम आणि वैयक्तिक आयुष्याचा ताळमेळ तेव्हा बसेल जेव्हा तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही करता. आपल्यासाठी कुटुंब आणि आपले काम एवढंच जग आहे. आपली मुलंही आपल्याकडे पाहून शिकतात. इथे कोणीही कायमचा आलेला नाही. ही गोष्ट ज्याला समजली त्याचे आयुष्य सोपे होईल असेही अदानी म्हणाले.