
शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने दादरमधील अपार्टमेंट 11.61 कोटी रुपयांना विकले आहे. गौरीने हे अपार्टमेंट 2022 मध्ये 8.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे अपार्टमेंट दादरमधील कोहिनूर अल्तिसिमोमध्ये 21 व्या मजल्यावर होते. हे अपार्टमेंट 2 हजार स्क्वेअर फुटांचे आहे. गौरीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. गौरी प्रसिद्ध प्रोड्युसर आणि इंटिरियर डिझायनर आहे. गौरीने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे घर इंटिरियर डिझाईन केले आहे.