
अलीकडेच अभिनेता आमीर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवशी त्याची नवीन प्रेयसी गौरी स्प्रॅटची मीडियासमोर ओळख करून दिली होती. त्यानंतर प्रथमच आमीर आणि गौरी चीनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एकत्र आले. दोघे मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिले. फेस्टिव्हलमध्ये आमीर खानला सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने हातात हात घालून चेहऱ्यावर हास्य दर्शवत आमीर-गौरीने फोटो काढले. त्यांनी शेन टेंग आणि मा ली यांच्यासोबत स्टेजवर दिसले.