
आलिशान कारमधून उतरून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. देश सोडून जायचे नाही, दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची, या अटी-शर्तीवर न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. मद्यधुंद अवस्थेत गौरव आहुजाने चौकात कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर येरवडा पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना अटक केली.