चेन्नईच्या शाळेत गॅस गळतीने 30 हून अधिक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, 3 जण गंभीर

तामिळनाडूची राजधानी चैन्नईच्या एका शाळेत संशयास्पद गॅस गळतीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास, डोळ्यांची जळजळ आणि चक्कर येण्याच्या तक्रारी वाढल्याने 30 हून अधिक विद्यार्थ्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यापैकी तीन मुलांची अवस्था गंभीर असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

एनडीआरएफचे कमांडर ए.के. चौहान यांनी याप्रकरणी सांगितले की, सध्या, या घटनेचे नेमके कारण सांगू शकत नाही. कारण नेमका त्रास त्यांना कशाने झाला याचे कारण कळत नाहीय. आमच्या पथकाने येऊन परिस्थितीचा आढावा घेतला सर्व काही सामान्य आहे, आम्हाला कोणत्या गॅसचा गंधही आला नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.