गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…, नगर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत,गुलालाची उधळण करत आज गणपतीची बाप्पाला नगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यायाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, नगरमधील मुख्य मिरवणुकीस श्री.विशाल गणेश मंदिर येथून प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मुर्ती होती. यावेळी सनई चौघडा, रुद्रनाद, युगंधर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्या वतीने पारंपारीक खेळ सादर करण्यात आले. यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. आज सकाळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते विधिवत मानाच्या गणपतीची पूजा करण्यात आली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष अभयागरकर यासह देवस्थानचे सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते प्रत्येक चौका चौकामध्ये गणपतीचे स्वागत करून महाआरती करण्यात आली अनेक ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली.

नगर शहरामध्ये सोळा मंडळांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतलेला आहे. मात्र उशिरा हे मिरवणूक निघाल्यामुळे या मिरवणुकीला वेळ लागणार आहे अनेक मंडळांनी सीडी तसेच आकर्षक अशी विद्युत रोषनाई सुद्धा मंडळाच्या भोवती केलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी नगर शहरातील निवडणुकीच्या संदर्भातला आढावा घेतला असून पोलीस बंदोबस्त सर्वत्र चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत.