
कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र अकरा दिवसांच्या श्री गणपती बाप्पांचे मंगळवारी अनंत चतुर्थीदिवशी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा बाप्पाचा जयघोष करण्यात आला. त्याचबरोबर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. सर्व वयोगटातीन नागरिकांनी गणपती विसर्जनाला उपस्थिती दाखवत वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गेले अकरा दिवस घरोघरी श्री गणेश मुर्तीचे पूजन करण्यात आले. आरती, भजन, फुगड्या व अन्य विविध कार्यक्रम पार पडले. कुडाळ, कणकवली, देवगड, दोडामार्ग, वैभववाडी, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, बांदा आदी सर्वत्र मंगळवारी सायंकाळी समुद्र, नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकठिकाणी श्री गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.