चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली परिसरातील यशवंत नगर येथे रात्रीच्यावेळेस चार दरोडेखोर हातात लाठी काटे घेवून चोरी करण्याच्या बेताने आले होते. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्या चारही जणांनी एका घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु घराच्या बाहेर लाईट सुरू असल्याने दारातूनच परतून गेले. तसेच त्यांनी दुचाकी चोरण्याचं प्रयत्न केला परंतु तिथे मोठा आवाज झाल्याने हा देखील प्रयत्न फसला आणि त्यांनी तेथून पळ काढला. मात्र ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.a
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांवर पोलिसांची वचक राहिली नाही. अशी प्रकरणे सतत घडत असल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर पडोली परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पडोली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. तसेच परिसरात नागरिकांनी पोलिसग्रस्त वाढविण्याची मागणी केली आहे.