दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे रविवारी मनोभावे विसर्जन करण्यात आले. (सर्व फोटो – रुपेश जाधव, सामना)
दीड दिवसात गणपती बाप्पाची सेवा भजन, कीर्तन, आरती, फुगड्या घालून करण्यात आली.
बाप्पाला लाडू, मोदक, करंज्यांसह गोडधोड आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
यानंतर रविवारी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना करत बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात आला.
गणपती विसर्जनासाठी दादर येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. तिथे घरगुती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
तसेच दादर चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे जीवनरक्षक दलही तैनात करण्यात आले होते.