परळ आणि लालबागमधील गणेश चित्रशाळांमधून रविवारी अनेक मोठे गणपती मंडपाकडे रवाना झाले. गणरायांच्या आगमनाचा सुपर संडेच गणेशभक्तांनी यानिमित्ताने अनुभवला. लालबाग-परळ भागात बाप्पांची एक झलक टिपण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. गुजरात नवसारी येथील भाविकांनी गणेशमूर्ती घेऊन मुंबई सेंट्रल स्टेशन गाठत बाप्पांना एक्सप्रेस ट्रेनचा प्रवास घडवला.