Gadchiroli News – पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून नागरिकाची हत्या

प्रातिनिधीक फोटो

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांनी एका नागरिकांची हत्या केली. गडचिरोलीतील भामरागड तहसिल अंतर्गत येणाऱ्या कियेर गावात रविवारी ही घटना घडली. सुखराम मडावी असे हत्या करण्यात आलेल्या नागरिकाचे नाव आहे.

माओवाद्यांनी मडावी याच्या मृतदेहाजवळ एक पत्रक ठेवले होते. यात मडावी हा पोलिसांचा खबरी होता. तसेच त्याने पेंगुंडा भागासह इतर ठिकाणी छावण्या उभारण्यास पोलिसांना मदत केली, असा दावा करण्यात आला होता. पोलीस अधिक तपास करत आहेत.