पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात योजनांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. पण या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना बुरशी असलेले जेवण वाढण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
विश्वकर्मा योजनेला वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट-अप योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी दूरदूरहून अनेक महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांसाठी जेवणाचीही सोय करण्यात आली होती. पण जेवणात जी भाजी वाढण्यात आली त्याला बुरशी लागली होती. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल
झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.