
आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज फरार व्यावसायिक ललित मोदी याने प्रशांत महासागरातील छोटय़ाशा बेटावर वसलेल्या वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. हिंदुस्थानच्या कायद्यापासून वाचण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे त्याचे हिंदुस्थानात प्रत्यार्पण करणे कठीण होणार आहे.
ललित मोदीच्या नव्या पासपोर्टचा पह्टो व्हायरल झाला आहे. ललित मोदीने वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे. 2010 मध्ये ललित मोदीने हिंदुस्थानातून लंडनला पलायन केले होते. त्याच्यावर आर्थिक अनियमितता, मनी लॉण्डरिंग आणि भ्रष्टाचार यांसारखे गंभीर आरोप आहे. ईडीने त्याच्याविरोधात कारवाई सुरू केली होती. न्यायालयानेही त्याला हजर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्याने देशाबाहेर पलायन केले. मोदीवर आयपीएल मीडिया राइट्स आणि फ्रँचायजी कराराच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.